Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळाताज्या घडामोडीसकारात्मक

वांगी नं:4 ता. करमाळा येथील कु सोनाली जयसिंग शेटे हिची राज्य विक्रीकर निरीक्षक पदी निवड

वांगी प्रतिनिधी  वांगी नं:4 ता. करमाळा येथील कु सोनाली जयसिंग शेटे हिची राज्य विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाली आहे. सोनालीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वांगी नं.4 येथे झाले तसेच माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल वांगी नं.1 येथे झाले तसेच तिचे उच्च माध्यमिक शिक्षण शारदानगर बारामती येथे झाले, तसेच महाविद्यालयीन शिक्षण कृषी महाविद्यालय पुणे येथे झाले. तिने सन 2020 रोजी राज्य विक्रीकर निरीक्षक पदाची परीक्षा दिली होती तिचा निकाल लागला असुन तिची नियुक्ती झाली आहे. तिच्या या यशा बद्दल वांगीचे माजी सरपंच श्री. विठ्ठल शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रा. शिवाजीराव बंडगर आदीनाथचे माजी व्हाईस चेअरमन श्री. शहाजीराव देशमुख,दत्ताबापू देशमुख सदस्य ग्रामपंचायत वांगी १ पुणे पोलिस श्री. सोमेश्वर यादव, अमोल मानेसाहेब वडील जयसिंग रंगनाथ शेटे ,सौ. सुशीला जयसिंग शेटे ,भाऊ धनसिंग जयसिंग शेटे ग्रामपंचायत सदस्य वांगी नं:4 तसेच सर्व ग्रामस्थांनी विशेष अभिनंदन केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!