करमाळा शहर व तालुक्यात २३ कोरोना पाॅझिटीव्ह मांगीत सर्वाधिक १७ कोरोना पाॅझिटिव्ह.

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहर व तालुक्यात २५ सप्टेंबर रोजी एकूण १८६ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये २९ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यात १७ पुरुष तर १२ महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहरात ६० ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये ६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ग्रामीण भागात १२६ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये २३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज २९ जणांना उपचार करून घरी सोडले असून आजपर्यंत १३५४ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तसेच सध्या ४४६ जणांवर उपचार सुरु असून आजपर्यंत तालुक्यात एकूण २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.करमाळा तालुक्याची कोरोनाबाधितांची संख्या १८२५ वर जाऊन पोहोचली आहे. करमाळा शहरामध्ये स्टेट बँक – १ पुरुष, पोथरे नाका – २ पुरुष, सुमंतनगर – १ पुरुष, मेनरोड – १ पुरुष, किल्ला विभाग – १ पुरुष ग्रामीण भागात
जेऊर – १ पुरुष, भोसे – १ महिला, भगतवाडी १ महिला, भालेवाडी १ पुरुष, जातेगाव – २ महिला, मांगी – ९ पुरुष, ८ महिला यांचा समावेश आहे. करमाळा शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे ही बाब दिलासादायक असली तरी ग्रामीण भागात मात्र मांगी गावात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले असल्याने ही बाब मात्र चिंताजनक आहे.
