देवळालीचे सरपंच गहिनीनाथ गणेशकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल
देवळाली प्रतिनिधी
ग्रामपंचायत देवळालीचे सरपंच गहिनीनाथ रामभाऊ गणेशकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. देवळालीचे संजयमामा शिंदे गटाचे सरपंच यांनी दि १९/११ रोजी करमाळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. दमदाटीने मनगटशाहीने चुलते औदुंबर गणेशकर यांना शिवीगाळ करत बांध नांगरून नुकसान केले व बांध फोडला आहे. संबंधित घटनेत सरपंच गहिनीनाथ गणेशकर व वडील रामभाऊ गणेशकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या पुर्वी ही सरपंच यांनी ग्रामपंचायत रकमेतुन बांधलेल्या गणेशकर वस्ती – शेरे वस्ती पूलाचा रस्ता बंद केलेला आहे. त्यामुळे संतापाने जनतेने तेव्हा ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला तेव्हापासुन आजतागायत आज पर्यंत सरकारी जमा-खर्चातून बांधलेला पुल सरपंच यांनी बंद ठेवलेला आहे. आज पुन्हा बांधफोडणे सारखा गुन्हा झाला असल्याने जनतेत असंतोष निर्माण झाला आहे.
