कै. डॉ. प्रदीपकुमार जाधव यांच्या पुण्यस्मरणार्थ आरोग्यसेवेचा उपक्रम -डॉ. रोहन पाटील ८ ते १० सप्टेंबरदरम्यान जाधव-पाटील हॉस्पिटलतर्फे अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी मुळव्याध शिबिर*
करमाळा :प्रतिनिधी
कै. डॉ. प्रदीपकुमार (आबा) जाधव पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आई कमला भवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था, करमाळा व जाधव-पाटील हॉस्पिटल यांच्या वतीने दि. ८ ते १० सप्टेंबर २०२६ या कालावधीत विशेष सेवाभावी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून हृदयरोग व मुळव्याधीच्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, आवश्यक तपासण्या आणि सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जाधव-पाटील हॉस्पिटलचे संचालक डॉ. रोहन पाटील यांनी दिली.
कै. डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रातून सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवा देण्याचे कार्य केले. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आरोग्यसेवेच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहण्याचा हा उपक्रम असल्याचे डॉ. रोहन पाटील यांनी सांगितले. ग्रामीण व सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा सुलभपणे उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शिबिरात विविध तपासण्या व उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
हृदयरोगाच्या रुग्णांसाठी शिबिरात हृदयरोग तज्ज्ञांचा मोफत सल्ला व 2D इको तपासणी करण्यात येणार आहे. हृदयाची सोनोग्राफी ५० टक्के सवलतीच्या दरात केली जाणार असून अँजिओग्राफी केवळ ५ हजार रुपयांत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच योजनेंतर्गत पात्र रुग्णांसाठी अँजिओप्लास्टी मोफत करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे डॉ. रोहन पाटील यांनी सांगितले.
अँजिओग्राफीसाठी दि. ८, ९ व १० सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत शिबिर होणार आहे. छातीत दुखणे, धाप लागणे, हृदयाशी संबंधित त्रास किंवा हृदयरोगाचा धोका असलेल्या नागरिकांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आवश्यक तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुळव्याधीच्या रुग्णांसाठी दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत विशेष शिबिर होणार आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मुळव्याध तज्ज्ञ डॉ. प्रदीप तुपे (एम.बी.बी.एस., एम.एस.—जनरल सर्जन) यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. तपासणी व उपचाराची सुविधा ७ हजार रुपयांत उपलब्ध असून, मुळव्याधीवरील इंजेक्शन उपचार (स्क्लेरोथेरपी) तसेच लेझर ट्रीटमेंटची सुविधाही उपलब्ध राहणार आहे.
जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत. तसेच जिजाऊ पॅथॉलॉजी लॅबमध्ये २४ तास विविध तपासण्यांची सुविधा असून रक्त व लघवी तपासणीसाठी मोफत होम कलेक्शनची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य तपासणी व उपचार घेणे अधिक सुलभ होणार आहे.
या विशेष शिबिरात डॉ. स्वप्नील माळी, डॉ. रोहन हेडगे, डॉ. रोहन पाटील व डॉ. सौ. शिवानी पाटील यांच्यासह तज्ज्ञ वैद्यकीय पथक सेवा देणार आहे. कै. डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित या सेवाभावी उपक्रमाचा करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटलचे संचालक डॉ. रोहन पाटील यांनी केले आहे.
शिबिराचे स्थळ : जाधव-पाटील हॉस्पिटल, अर्बन बँकेशेजारी, मेन रोड, करमाळा.
संपर्क : ७५५९२१४५५१, ८३२९४५९५९१, ८९७५६७६०२०, ७५०७३१४१३३, ९६०७१२९०१६.


