Sunday, September 20, 2026
Latest:
Uncategorized

तब्बल ५० वर्षांनंतर भेटले महात्मा.गांधी. विद्यालयाचे माजी विद्यार्थी :- १९७५ चे जून्या एस.एस.सी. (११ वी ) बोर्डाचे विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

करमाळा प्रतिनिधी        तब्बल ५० वर्षांनंतर भेटले म.गां. विद्यालयाचे माजी विद्यार्थी १९७५ चे जून्या एस.एस.सी.
(११ वी ) बोर्डाचे विद्यार्थी -विद्यार्थीनी  तब्बल ५० वर्षांनंतर भेटीची ओढ लागली होती. त्यामुळे अभुतपुर्व अशा ६३ माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात उत्साही वातावरणात दि. ११ जून २०२५ रोजी स्नेह मेळावा आयोजित केला. स.९.३० वा. स्नेह मेळाव्याला सुरुवात झाली. प्रथम आर. आर. मोरे सर, एस. एम. शिंदे सर, जाधव सर, विधाते सर, मोटे सर, सोनी मॅडम यांचा यथोचित सन्मान, सत्कार केला. आणि रॅलीने वाजत गाजत छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आलो. नंतर राजयोग हाँटेलवरील हाॅलमध्ये एकमेकांच्या भावना अर्थात अनुभव कथन म्हणजेच मनोगताचा कार्यक्रम झाला. यावेळी देहभान विसरून गाणी, अभंग, कविता, बासरी वादन यातही माजी विद्यार्थ्यांनी मनसोक्त सहभाग घेतला. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर एक वेगळा आनंद ओसंडून वाहत होता. शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये नागेश माने, किरण यादव, सोमनाथ चिवटे, मोहन देवी, सतिश शीलवंत, भारत वांगडे, विजया कोग्रेकर- महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!