करमाळा

करमाळा पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी. अवैधरित्या गोवंशाची कत्तलीच्या उददेशाने वाहतुक करणाऱ्या आरोपी वाहनासह मुददेमाल जप्त करून २६‌ जनावरांना जीवनदान.

करमाळा प्रतिनिधी
करमाळा पोलिस स्टेशनने दमदार कामगिरी केली आहे अवैधरित्या गोवंश यांची कत्तल करण्याच्या उददेशाने वाहतुक करीत असताना मिळुन आल्याने आरोपी व वाहनासह मुददेमाल जप्त करून २६‌ जनावरांना जीवनदान दिले आहे.
दि. ११/०६/२०२५ रोजी पहाटे ०४/०० वा. कौसिन जमील कुरेशी वय २२ वर्षे रा. पंजाब वस्ताद चौक, करमाळा ता. करमाळा, जि. सोलापुर हा त्याचेकडील महिंद्रा पिकअप क्र. एमएच-१२-एसएफ-५०२८ मधुन लहान काळया पांढ-या रंगाची एकुण २२ जर्शी गायीची वासरे व ४ काळया पांढ-या रंगाच्या मोठ्या जर्शी गायी यांना चारा पाण्याची सोय न करता, दाटीवाटीने निर्दयतेने वागणुक देवून त्यांना दाव्याने बांधुन, त्यांचे औषधोपचाराची कोणतीही सोय न करता त्यांची कत्तल करण्याच्या उददेशाने कोणताही वाहतुक करण्याचा परवाना जवळ नसताना मिळुन आला आहे. म्हणुन वगैरे मजकुरचा करमाळा पोलीस ठाणे गुरनं. ४७०/२०२५ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधि. कलम ११ (१) (सी), (जी), (डी), (जे), (के) सह महाराष्ट्र पशु सरंक्षण अधि. कलम ५ व ९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचे मा.श्री. रणजित माने सोो, पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस ठाणे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीचे अनुषंगाने करमाळा पोलीस ठाणेकडील पोलीस सब इन्स्पेक्टर संदेश चंदनशिव यांना व पोकॉ/१६७ मिलींद दहिहांडे व पोकॉ/६८९ योगेश येवले असे पथकासह माहिती मिळालेल्या ठिकाणी रंभापुरा, करमाळा येथील नाल्याजवळ थांबुन सदर आलेल्या वाहनाचा संशय आल्याने त्यास थांबवुन सदर वाहनाचा नंबर एमएच-१२-एसएफ-५०२८ हा मिळालेल्या बातमीनुसार खात्री करून सदर वाहन चालक कौसिन जमील कुरेशी वय २२ वर्षे रा. पंजाब वस्ताद चौक, करमाळा ता. करमाळा, जि. सोलापुर याचेकडे विचारपुस करून सदर वाहनाची पाहणी केली असता सदर पथकास त्यामध्ये लहान काळया पांढ-या रंगाची एकुण २२ जर्शी गायीची वासरे व ४ काळया पांढ-या रंगाच्या मोठ्या जर्शी गायी यांना चारा पाण्याची सोय न करता, दाटीवाटीने निर्दयतेने वागणुक देवून त्यांना दाव्याने बांधुन, त्यांचे औषधोपचाराची कोणतीही सोय न करता त्यांची कत्तल करण्याच्या उददेशाने कोणताही वाहतुक करण्याचा परवाना जवळ नसताना मिळुन आल्याने सदरबाबत मा. रणजित माने सोो यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देवून सदर इसमांविरूध्द करमाळा पोलीस ठाणेस गुन्हा दाखल केला असुन सदर इसम कौसिन जीमल कुरेशी वय २२ वर्षे रा. पंजाब वस्ताद चौक, करमाळा ता. करमाळा, जि. सोलापुर यास पोलीसांनी ताब्यात घेवून त्याचेवर कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास सहा. पोलीस सब इन्स्पेक्टर वाडगे हे करीत आहेत.

सदर गुन्हयातील मिळुन आलेले लहान काळया पांढ-या रंगाची एकुण २२ जर्शी गायीची वासरे व ४ काळया पांढ-या रंगाच्या मोठ्या जर्शी गायी यांना कोणताही पास परवाना नसताना तसेच त्यांची वाहतुक करण्याच्या उददेशाने वाहतुक करण्याचा कोणताही परवाना नसताना वाहतुक करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरी पण सदर असे लोक बेकायदेशिरपणे अशा प्रकारचा गुन्हा करतात. आम्ही सदर गुन्हयात मिळुन आलेली सर्व जनावरे यांची वैदयकिय अधिकारी, पशुधन विभाग, करमाळा यांचेकडुन त्यांची वैदयकिय तपासणी करून त्यांची कोणतीही गैरसोय न करता त्यांना शासन प्रमाणित असलेल्या गोशाळेमध्ये ठेवून त्यांची योग्य ती निगा राखुन त्यांची काळजी घेणेबाबत त्यांना विनंती करण्यात आली आहे.सदर करमाळा पोलीस ठाणेकडील या केलेल्या उल्लेखणीय कारवाईमुळे अनेक गोवंश यांची अमानुषपणे कत्तल होण्यापासुन प्रतीबंध होवु शकतात. सदरच्या गोवंश यांना शासन प्रमाणित असलेल्या गोशाळेमध्ये ठेवुन त्यांची व्यवस्थीत निगा राखली जाते. त्यांचे चारा पाणी तसेच औषधोपचाराची योग्य ती दखल घेतली जाते अशा प्रकारच्या शासनाच्या अनेक योजना असताना देखील असे काही लोक गोवंश सारख्या पशुंना त्यांची कत्तल करून आपला व्यवसाय करण्याच्या उददेशाने कायदयाचे उल्लंघन करतात. अशा कारवाईमुळे असे कृत्य करणा-या लोकांवर आमची कडक नजर असुन आम्ही अशा प्रकारचे गुन्हे करण्या-या इसमांवरती कडक कारवाई करण्याचे आमचे लक्ष आहे.
सदरची कामगिरी ही श्री. अतुल कुलकर्णी साो, पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण, डॉ. प्रितम यावलकर साो, अपर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण, श्री. अजित पाटील साो, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, करमाळा यांचे मार्गदर्शनाखाली श्री. रणजित माने, सो, पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस ठाणे, संदेश चंदनशिव, पोलीस सब इन्स्पेक्टर, पोकॉ/१६७ मिलीद दहिहांडे, पोकॉ/६८९ योगेश येवले यांनी केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!