करमाळा शहर भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी अनिकेत जाधव यांची निवड
करमाळा प्रतिनिधी : – भारतीय जनता पार्टी करमाळा शहर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते अनिकेत जाधव यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांना निवडीचे पत्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी दिले ,
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते संजय अण्णा घोरपडे, डबल महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अफसर तात्या जाधव, नगरसेवक रामभाऊ ढाणे, अमोल पवार, दिनेश मडके, प्रवीण बिनवडे, सचिन चव्हाण यांच्यासह भाजपा पदाधिकारी यांनी अनिकेत जाधव यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नेते संजय अण्णा घोरपडे यांनी सांगितले की युवा कार्यकर्त्यांमध्ये मोठी ऊर्जा असून या ऊर्जेला संघटनात्मक कामाची जोड देण्याचे काम युवा मोर्चाने करावे तसेच सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी अनिकेत जाधव यांच्या निवडीचे स्वागत करत, करमाळा शहरातील युवकांना मोठ्या संख्येने भाजपच्या विचारांशी जोडण्यासाठी युवा मोर्चाने सक्रियपणे काम करावे, असे आवाहन केले. पक्षाची विचारधारा आणि केंद्र व राज्य सरकारची विकासकामे युवकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी युवा कार्यकर्त्यांनी पार पाडावी असे सांगितले.
नूतन भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी अनिकेत जाधव यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “युवा शक्ती ही भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद आहे. करमाळा शहरातील युवकांना संघटित करून पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी अनिकेत जाधव यांनी काम करावे. सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन युवा मोर्चाला अधिक गतिमान करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावे. पक्षाने दिलेली ही जबाबदारी निश्चितच सक्षमपणे पार पाडाल, असा विश्वास आहे.”असे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी सांगितले,
अनिकेत जाधव यांच्या नेतृत्वाखाली करमाळा शहर युवा मोर्चाचे संघटन अधिक मजबूत होऊन आगामी काळात पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये युवकांचा सहभाग वाढेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी भाजपा पदाधिकारी, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


