करमाळा शहरात शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी 22 कोरोना पाॅझिटीव्ह एकुण कोरोना रुग्णांची संख्या 150

करमाळा प्रतिनिधी शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी करमाळा शहरात 92 एॅंटाजीन टेस्ट घेण्यात आल्या असून यामध्ये 22 कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळून आले असुन 72 निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली आहे. करमाळा शहरातील बागवाननगर -9, मोलाली माळ – 2, सुतारगल्ली -3, कानाडगल्ली -2, भिमनगर -1, सुमंतनगर -4, श्रावणनगर -1 असे 1 आॅगस्ट रोजी एकुण कोरोना रुग्णांची संख्या 22 असुन आतापर्यंत एकुण रुग्णांची संख्या 150 झाली आहे. करमाळा शहरात कोरोना रुग्ण वाढत असून नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले आहे.

