Tuesday, April 22, 2025
Latest:
Uncategorized

वाशिंबे चौफुला येथे प्रभु श्रीरामाच्या फोटोला दुधाने अभिषेक करून भाजपने केले अनोखे आंदोलन.


वाशिंबे प्रतिनिधी
वाशिंबे चौफुला या ठिकाणी भाजपा युवा नेते अमोल पवार यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामाच्या फोटोला दुधाने अभिषेक करुन दुध दर वाढीसाठी आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप किसान मोर्चा प्रदेश चिटणीस दादासाहेब येडे, विहिंपचे संतोष वाळुंजकर, निलेश वाघमोडे, युवा मोर्चा चे मा,अध्यक्ष अमोल जरांडे शेतकरी संघटनेचे आण्णा झोळ, निलेश झोळ,किशोर वगरे, अतुल पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना भाजप युवा नेते अमोल पवार म्हणाले की दुग्ध व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ग्रामीण भागात उत्पादित केलेले दूध शहरी ग्राहकांना रास्त दराने विकण्याची जबाबदारी ही शासनाची आहे. शासनाच्या शेती विषयक धोरणातील अंमलबजावणीचा अभाव नैसर्गिक आपत्ती अशा चहुबाजूनी समस्यांच्या गर्तेत शेतकरी सापडला आहे.शेती पूरक व्यवसाय हे ग्रामीणअर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करणारे असतात.आपल्या राज्यातील दुध धंद्याची व्याप्ती पाहता हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान हे देखील खुप मोठ्या प्रमाणात होत आहे.याची दखल राज्याच्या नेतृत्वाने घ्यायला हवी आहे.. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपली राजकीय ताकद वापरायला हरकत नसावी. मनांत आणलं तर ते हा प्रश्न निश्चितच सोडवु शकतात. पशुखाद्याचे बाजार, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, या सर्व संकटांचा सामना करत असताना शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये दुधाला मिळणारा बाजारभाव पाण्यापेक्षा ही कमी आहे ही वस्तुस्थिती आहे तरी हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने सोडवणे गरजेचे असुन सरकारने तात्काळ प्रति लिटर दहा रुपये अनुदान जाहीर करावे अशी मागणी अमोल पवार यांनी केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group