करमाळासकारात्मक

साडे हायस्कुल येथे अमृतमहोत्सवी 75 वा स्वातंत्रदिन मोठया उत्साहात साजरा

साडे  प्रतिनिधी साडे ता.करमाळा येथील साडे हायस्कूल येथे गावच्या प्रथम नागरिक सरपंच अनिता पाटील यांच्या हस्ते ७५ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहन सोहळा पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी श्री यशवंत प्रसाद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गोकुळराव पाटील हे होते.याप्रसंगी संस्थेचे सचिव देविदास ताकमोगे, जेष्ठ संचालक डॉ.वसंतराव पुंडे, उपाध्यक्ष बाजीराव माने, माजी पंचायती समिती सदस्य दत्तात्रय जाधव, माजी मुख्याध्यापक पोपट शेलार, वैद्यकीय अधिकारी रविंद्र पुंडे, महाराष्ट्र शासन सेवेतील अधिकारी अमोल आमले, पोलिस पाटील, राजेंद्र पाटील, आजिनाथ आडेकर ग्रामपंचयतीचे तसेच विविधकार्यकारी सोसायटीचे सर्व सदस्य आदि मान्यवरांसह आजी माजी सैनिक तसेच मोठया संख्येने ग्रामस्थ व युवा वर्ग उपस्थित होते. यावेळी मार्च २०२२ मध्ये परिक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यातुन प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास १०००० व्दितीय ५५०० तर तृतीय ५००० अशी बक्षिसे प्रशाला व ग्रामस्थांकडुन देण्यात आली. याप्रसंगी डॉ. वसंतराव पुंडे यांनी शौक्षणिक साहित्य तसेच हेमंत पुंडे यांनी दररोज थंड पाण्याची सुविधा उपलब्ध केल्याबद्दल साडे येथील शिक्षणप्रेमी आनंद गावडे यांनी गरजु मुलींसाठी सायकल व इतर शौक्षणिक साहित्यासाठी ७५०००/- रूपये देणगी आणि बाजीराव माने यांचेकडुन वसतिगृहातील विद्यार्थ्याना गणवेश देण्यात आल्याबद्दल त्यांना श्रीफळ व गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले . प्रशालेच्या वतीने राहुल शिंदे यांनी आभार व्यक्त केले. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश मस्के यांचेतर्फे विद्यार्थ्याना खाऊचे वाटप केले. ध्वजारोहन कवायत व मानवंदनाची जबाबदारी किडाशिक्षक सतीश ढवळे व गणेश अवताडे यांनी उत्तमरित्या पार पाडली . प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यावेळी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन गाडेकर व आवटे सर यांनी केले तर आभार राहुल शिंदे यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group