बालकांची मोफत हदयविकार तपासणी आणि शस्त्रक्रिया करून वाडिया हॉस्पिटलचा अनोख्या पध्दतीने स्वातंत्र्यदिन साजरा
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि रोटरी क्लब आँफ मुंबईच्या संयुक्त विद्यमाने होणार १०० हून अधिक चिमुरडे होणार हदयरोग मुक्त
मुंबई: ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, वाडिया हॉस्पिटलने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष (सीएमआरएफ) आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांसाठी दोन दिवसाचे (१२ व १३ आँगस्ट) मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या आरोग्य शिबीराचे उद्घाटन मा. श्री उदय सामंत, कॅबिनेट मंत्री यांच्या हस्ते झाले. याप्रंसगी खासदार मा. राहुल शेवाळे, अभिनेता श्री शरद पोंक्षे, सयाजी शिंदे, सीएमआरएफचे श्री मंगेश चिवटे, रोटरी क्लब ऑफ बॉम्बेचे सचिव श्री आंनद माने आणि वाडिया हॉस्पिटलच्या सीईओ डॉ मिनी बोधनवाला तसेच रुग्णालयातील डॉक्टर उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना श्री.उदय सामंत म्हणाले की, आरोग्य क्षेत्राचे कार्य आणि त्याचे महत्व याबाबत मला जाणीव आहे. राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळत आहे याचा मला अभिमान आहे. या मोफत शिबीराच्या माध्यमातून अनेक बालकांना उपचार लाभणार असून त्यांना नवे जीवन मिळणार आहे आणि आम्ही ज्यांना साथ दिली त्यांच्या पुढाकाराने हे घडणार आहे ही आनंदाची बाब आहे.वाडिया हॉस्पिटलच्या सीईओ डॉ मिनी बोधनवाला म्हणाल्या, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष (सीएमआरएफ) आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांनी पुढाकार घेऊन गरजू बालकांसाठी सहकार्य केल्याने यामुळे बालकांमधील हदयविकाराचे वेळेत निदान केले जाणार असून त्यावर उपचारही मोफत करण्यात येणार आहेत. हदयविकाराचे निदान वेळेत झाल्यास ते उपचारांनी बरेही होतात हेच उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन २०१७ साली हदयविकार विभागाची स्थापना केली. या विभागामध्ये आतापर्यत ५ हजाराहून अधिक बालकांवर यशस्वी उपचार केले आहेत. या विभागाच्या उभारणीसाठीचा निधी लिटिल हार्ट्स मँरेथाँनच्या माध्यमातून उभारण्यात आला. कोविड काळात थांबलेली ही मँरेथाँन आता पुढल्या वर्षीपासून पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबीराच्या माध्यमातून निदान झालेल्या आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्याया १०० बालकांची मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी रोटरी कल्ब आँफ मुंबईने सहायता केल्याबद्दल त्यांचेही रूग्णालय मनापासून आभार मानत आहे.वाडीया रूग्णालयाच्या सर्व आर्थिक समस्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन खासदार राहुल शेवाळे यांनी याप्रसंगी दिले.
चौकट
2 दिवसीय हृदय तपासणी शिबिरात 12 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 3:00 या वेळेत मोफत २डी इको स्क्रीनिंग आणि मुलांसाठी मोफत वैदयकीय सल्ला दिला जाईल.
—
