Saturday, April 26, 2025
Latest:
करमाळा

आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने करमाळा बाजार समिती निवडणुक बिनविरोध मा.आ. जयवंतराव जगताप यांची सत्ता कायम

करमाळा प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली अनेक दिवसांपासून पाहायला मिळत होत्या. अखेर करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील , धैर्यशील मोहीते पाटील यांनी जगताप ,बागल, पाटील या प्रमुख गटांना एकत्र करण्यात यशस्वी झाले.गत निवडणूकीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती वर सत्ता मिळवण्यासाठी पाटील गट ,बागल गट आणि जगताप गट हे मोठ्या चुरशीचे प्रयत्न करत होते. २५ वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदी राहिलेले जयवंतराव जगताप हे गेल्यावेळी सत्तेपासून दूर राहीले. सभापती पदाची खुर्ची ही गेली होती. ऐनवेळी शिवाजीराव बंडगर यांनी बागल गटाशी हात मिळवणी करत सभापती पद मिळवले होते. त्यामुळे जयवंतराव जगताप यांना सभापती पदापासून दूर राहावे लागले होते . सत्तेसाठी टोकाच्या भूमिकेचा पवित्रा घेत निवडणूक पार पडली होती. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेसाठी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचा विचार करता रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी करमाळ्यातील मुख्य गटांना एकत्र घेऊन ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व गटाशी समन्वय साधून आणि सर्वांना विश्वासात घेऊन ही निवडणूक बिनविरोध करत जयवंतराव जगताप यांच्या हाती सत्ता दिली आहे.
त्यामुळे जयवंतराव जगताप यांची गेलेली सभापती पदाची खुर्ची पुन्हा एकदा मिळालेली असून ते लवकरच सभापती पदावर विराजमान होणार आहेत 
नूतन संचालक मंडळ
सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण :
१) जयवंतराव जगताप २ )शंभूराजे जगताप३ ) जनार्धन नलवडे ४ ) महादेव कामटे ५) तात्यासाहेब शिंदे ६ ) रामदास गुंडगीरे ७) सागर दोंड
ओबीसी :
१) शिवाजी राखुंडे
एनटी :
१) नागनाथ लकडे.
महिला :
१) सौ .शैलजा मेहेर २) सौ . साधना पवार ; ग्रामपंचायत सर्वसाधारण :
१)नवनाथ झोळ २ ) काशीनाथ काकडे .
अनुसूचित जाती जमाती :
१)बाळू पवार
आर्थिक दुर्बल घटक :
१) कुलदीप पाटील
व्यापारी मतदारसंघ :
१) परेशकुमार दोशी २) मनोजकुमार पितळे
माल /तोलार :
१) वालचंद रोडगेकरमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप व बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांची अकलूज येथे महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक लागल्यापासून ही निवडणूक होणार की, बिनविरोध होणार ? याविषयी उलटसुलट चर्चा होती.. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कशी होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी माजी आमदार जयवंतराव जगताप गट, माजी आमदार नारायण पाटील गट, बागल गट या सर्व गटांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
दोन दिवसांपूर्वीच आमदार संजय शिंदे गटाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे उर्वरित तीन गटांमध्ये काय होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. गुरुवारी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी अकलूज येथे जाऊन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भेट घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात चर्चा केली होती.शुक्रवारी शिवरत्न बंगल्यावर आमदारांची मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी या प्रमुख नेत्यांबरोबर धैर्यशील मोहिते पाटील,नवनाथ झोळ,अजित तळेकर,देवानंद बागल,कल्याण सरडे भारत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती .या बैठकीत बागल गटासाठी दोन व माजी आमदार नारायण पाटील गटासाठी दोन या ग्रामपंचायत मतदारसंघांतील जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता . उर्वरित सोसायटी मतदारसंघातील 11 जागा माजी आमदार जयवंतराव जगताप गटाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक बिनविरोध झाली आहे. मोहिते पाटील यांनी केलेल्या जगताप, पाटील व बागल यांच्यातील समझोता आणि शिंदे गटाने जगताप यांना दिलेला पाठिंबा यामुळे हे शक्य झाले आहे. अतुल खुपसे व भाजपचे उमेदवार काय निर्णय घेतील याची उत्सुकता लागलेली असताना शेवटच्याक्षणी ही निवडणुक बिनविरोध झाली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून आबासाहेब गावडे यांनी काम पाहिले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group