जनसेवा हिच खरी ईश्वर सेवा मानुन काम करणाऱ्या विजयामालाताई चवरे यांचे कार्य प्रेरणादायी – सौ.स्वातीताई फंड
करमाळा प्रतिनिधी जनसेवा हिच खरी ईश्वर सेवा मानुन काम करणाऱ्या विजयामालाताई चवरे यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत जिजाऊ ग्रुपच्या अध्यक्षा नगरसेविका सौ.स्वातीताई फंड यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काॅंग्रेस करमाळा उपाध्यक्ष सौ.विजयामाला चवरे यांच्या वाढदिवसानिम्मित फंड वस्ती येथे वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज असुन सामाजिक उपक्रमाद्वारे निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला आहे .सौ.विजयामालाताई चवरे यांच्या वाढदिवसानिम्मित जिजाऊ ग्रुपच्या अध्यक्षा नगरसेविका सौ.स्वातीताई फंड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी पुढे बोलताना स्वातीताई फंड म्हणाल्या की आपले कुटुंब संभाळुन संघर्षमय जीवनातुन महिला सक्षमीकरणासाठी सदैव कार्यरत राहुन समाजसेवेबरोबर राजकारणात यशस्वी काम करणाऱ्या विजयामालाताई चवरे यांचा आदर्श घेऊन महिलांनी वाटचाल गरजेचे आहे. या कार्यक्रमास योगिता चवरे अक्षरा फंड, अर्चना फंड शोभा इंदलकर, ऊर्मिला फंड , राणे, नेहा बादाडे, महिला उपस्थित होते.
