मनसे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे यांचे वडील वसंत मोरे यांचे निधन झाल्याने आमदार संजयमामा शिंदे यांची सांत्वन पर भेट
करमाळा प्रतिनिधी मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष नानासाहेब मोरे यांचे वडील कै.वसंत नारायण मोरे यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले.आज मोरे परीवाराची करमाळा तालुक्यांचे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांनी त्याच्या निवासस्थानी भेटून सांत्वन केले.
यावेळी उद्योजक भरतभाऊ आवताडे,मांगी वि.वि.सोसायटीचे चेअरमन सुजिततात्या बागल,राष्ट्रवादी युवक कोंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष आशपाकभई जमादार,बालरोगतज्ञ डॅा.प्रशांत करंजकर,युवक नेते अभिषेक आव्हाड,पत्रकार डि.जी.पाखरे,सामाजिक कार्यकर्ते अमोल परदेशी,स्वीयसहाय्यक प्रविण शिंदे गुरुजी,सचिन शेळके,राहुल शिंदे आदि उपस्थित होते.
