करमाळा

1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना 1982- 84 जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी खासदार आमदार यांना शिक्षकांचे पोस्टाने निवेदन

करमाळा प्रतिनिधी 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना 1982- 84 जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने आपल्या महाराष्ट्रातील 288 विधानसभेचे आमदार व 48 लोकसभेचे खासदार त्याचबरोबर राज्यसभेचे खासदार व 78 विधान परिषदेचे आमदार त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख यांना पोस्टाने निवेदन पाठवण्याचे नियोजन केलेले आहे .सदर उपक्रम शिक्षक दिनाच्या निमित्ताने सुरू केलेला आहे तरी सर्व मान्यवर आमदार साहेब, खासदार साहेब मंत्री महोदय, सर्व पक्ष प्रमुख यांनी आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ही विनंती आज करमाळा तालुका जुनी पेंशन संघटनेच्या वतीने पोस्टात निवेदनाची पत्रे पाठवली त्यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री अरूण चौगुले, श्री सतिश चिंदे, श्री अजित कणसे, श्री साईनाथ देवकर, श्री विनोद वारे, श्री प्रताप राऊत ,श्री मारूती ढेरे,मुचकुंद काळे, श्री प्रसाद कुलकर्णी, श्री सुधीर माने, श्री श्रीकृष्ण भिसे, श्री उदय काटुळे, श्री अशोक दुधे, श्री सखाराम राऊत व जुनी पेंशन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते*

*अशा प्रकारचे निवेदन देण्याचे नियोजन केल्याची माहिती सोलापूर जिल्हा जुनी पेंशन संघटनेचे जिल्हा नेते श्री तात्यासाहेब जाधव यांनी दिली*

error: Don\'t try to copy. Content is protected !!