Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळाताज्या घडामोडी

राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा करमाळा शहर कार्यकारिणी जाहीर

जेऊर प्रतिनिधी
राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा या बामसेफ प्रणित राष्ट्रव्यापी संघटनेची करमाळा शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यावेळी तालुका अध्यक्ष शहाबुद्दीन शेख आणि तालुका कार्याध्यक्ष कयूम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कार्यकारणी गठित करण्यात आली.यामध्ये कादिर शेख यांची शहराध्यक्ष पदी, राजू मुलाणी यांची शहर उपाध्यक्ष पदी, अल्लाउद्दीन शेख यांची कोषाध्यक्ष पदी, मैनोद्दीन शेख यांची सचिव पदी, जावेद मणेरी यांची सहसचिव पदी तर अलिम खान यांची कार्यकारी सदस्य पदी निवड करण्यात आली.नूतन पदाधिकारी यांना बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आर. आर. पाटील, प्रोटॉनचे जिल्हा सचिव विश्वनाथ सुरवसे, राष्ट्रीय घुमंतू जनजाति मोर्चाचे जिल्हा संयोजक दिनेश माने, जिल्हा प्रभारी गौतम खरात, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा जेऊर युनिट अध्यक्ष बशीर शेख, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्कचे जिल्हा महासचिव भीमराव कांबळे, कल्पेश कांबळे, हरी खरात, बहुजन मुक्ती पार्टी चे दिनेश दळवी, बाबुराव जाधव, विनोद हरिहर, हनुमंत पांढरे, सागर बनकर, आदिनाथ माने, रोहन गरड, संतोष शिंदे यांच्यासह बामसेफ व सहयोगी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group