करमाळा शहर व तालुक्यात २३ सप्टेंबर रोजी ५८ कोरोना पाॅझिटिव्ह

करमाळा प्रतिनिधी. करमाळा शहर व तालुक्यात २३ सप्टेंबर रोजी एकूण २१२ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये ५८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यात ३५ पुरुष तर २३ महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहरात १०० ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये २० जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ग्रामीण भागात ११२ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये ३८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज ४४ जणांना उपचार करून घरी सोडले असून आजपर्यंत १२६३ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तसेच सध्या ४८४ जणांवर उपचार सुरु असून आजपर्यंत तालुक्यात एकूण २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्याची कोरोनाबाधितांची संख्या १७७१ वर जाऊन पोहोचली आहे. करमाळा शहरामध्ये सिंचननगर – १ पुरुष, १ महिला, कृष्णाजीनगर – १ पुरुष, किल्ला विभाग – ३ पुरुष, सावंत गल्ली – १ पुरुष, शिवाजीनगर १ महिला, गणेशनगर – ३ पुरुष, ४ महिला, जामखेड रोड – १ पुरुष, भिमनगर – १ पुरुष, सिद्धार्थनगर – १ पुरुष, कमलानगर – १ पुरुष, कुकडे प्लॉट – १ पुरुष ग्रामीण भागात एकूण ३८ कोरोना बाधित आहे. यामध्ये कुंभेज – १ पुरुष, वीट – १ महिला, जिंती – १ महिला, कात्रज – ३ पुरुष, १ महिला, पांडे – १ पुरुष, देवळाली – १ पुरुष, सावडी – १ पुरुष, मांगी – १३ पुरुष, १३ महिला, जवळा – २ महिला यांचा समावेश आहे.
