करपडी शिंपोरा शिव रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता पूर्ण करण्यासाठी रामभाऊ हाके यांच्या नेतृत्वाखाली सरपंच सौ. राणी तुषार हाके यांचे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्याकडे मागणी*
करमाळा प्रतिनिधी करपडी शिंपोरा शिव रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ दूर करून रस्त्याचे काम तरी सुरू करण्यासाठी कावळवाडीच्या विद्यमान सरपंच सौ राणी तुषार हाके यांच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे.कावळवाडीचे माजी सरपंच मकाई सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक रामभाऊ हाके यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की मानेवाडी फाटा ते कावळवाडी करपडी शिव हा रस्ता तीन किलोमीटर रस्ता मंजूर असून सदर रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असल्यामुळे रस्त्याचे काम करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर रस्त्यावरील अडथळा आणणाऱ्या शेतकऱ्याची अतिक्रमण तात्काळ काढणे गरजेचे आहे तरी आपण सदर रस्ता अडथळा दूर करण्यासाठी व मंजूर रस्ता पूर्ण करण्यासाठी तहसीलदार कर्जत यांना सूचना द्याव्यात रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची आदेश द्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे. सदर प्रश्नाचा गांभीर्याने विचार करून आपण लवकरात लवकर आदेश देऊन रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असे अभिवचन प्राध्यापक राम शिंदे यांनी सरपंच तुषार हाके रामभाऊ हाके व त्यांच्या सहकाऱ्यांना दिले आहे.


