यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये सेवापूर्तीनिमित्त मुख्य लिपिक विक्रमसिंह सूर्यवंशी व प्राध्यापक सौ संध्या सुनील बिले सत्कार समारंभ संपन्न
. 
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील कार्यालयातील मुख्य लिपिक श्री.विक्रमसिंह प्रतापराव सुर्यवंशी व कनिष्ठ विभागातील वाणिज्य विभागाच्या सौ.संध्या सुनिल बिले आज 31 जुलै 2025 रोजी सेवेतून निवृत्त झाले. यांच्या सेवापूर्ती निमित्त त्यांचा सत्कार संस्थेचे सचिव आदरणीय श्री.विलासरावजी घुमरे (सर), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सौ.संध्या सुनिल बिले मॅडम यांनी मनोगतातून आमचे आधारस्तंभ मा. विलासरावजी घुमरे सर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असे मत व्यक्त केले. तसेच श्री.विक्रमसिंह सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून मा. विलासरावजी घुमरे सर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी माझे कार्य केले आणि अंगीकारले असे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.यांनी उर्वरित आयुष्य आनंदात जावे सुखाने समृद्धीने घालावे अशा शुभेच्छा दोघांना दिल्या तर विलासरावजी घुमरे सर यांनी आपल्या मनोगतातून हे दोन्हीही सदस्य सेवेतून निवृत्त होत असले तरी यशवंत परिवाराचे आजीव सभासद राहतील असे सांगून त्यांच्या भावी आयुष्य निरोगी रहावे अशा शुभेच्छा दिल्या . याप्रसंगी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य श्री.संभाजी किर्दाक आणि कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा .एम .डी जाधव यांनी केले तर आभार प्रा नितीन तळपाडे यांनी मानले .


