Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळासकारात्मकसहकार

आदिनाथ कारखाना आमच्या ताब्यात दिला तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याप्रमाणे भाव देऊ-आमदार बबनदादा शिंदे!!!

करमाळा (प्रतिनिधी)
तीन वर्षांपूर्वी आदिनाथ कारखान्याची भाडे करार प्रक्रिया चालू झाल्यानंतर काही राजकीय अडचणीमुळे मला लक्ष घालता आले नाही मात्र आता सभासदांनी आदिनाथ आमच्या ताब्यात दिला तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याप्रमाणे आदिनाथच्या सभासदांना उसाचा भाव देऊ दिवाळीला साखर देऊ असे सांगत आमदार बबन दादा शिंदे आपल्या खुमासदार भाषणातून उपस्थितांची मने जिंकली चि.येथे आमदार संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या उद्घाटन प्रसंगी च्या कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे दूध संघाचे माजी संचालक विकास गलांडे जेष्ठ पत्रकार नासिर कबीर आदी पदाधिकारी उपस्थित होतेश्रावण मासानिमित्त आमदार बबनदादा शिंदे यांनी चिखलठाण येथील कोटलिंग मंदिरात सपत्नीक महाभिषेक केला.यावेळी बोलताना बबन दादा शिंदे म्हणाले की करमाळा तालुक्यातील दरवर्षी आम्ही तीन लाख टन ऊस गाळप साठी घेतो शिवाय या सर्व उसाचे पैसे तोडणी वाहतूक दाराचे पैसे अत्यंत वेळेवर देतो

आदिनाथ सहकारी साखर कारखाना चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे ही सर्व सभासदांची भावना आहे आज करमाळा तालुक्यात प्रचंड चारी बाजूने ऊस आहे सभासदांनी हा कारखाना आमदार संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून आमच्या शिंदे बंधूंच्या ताब्यात दिला तर सहकार तत्त्वावरच अत्यंत चांगल्या पद्धतीने हा कारखाना चालवून आमच्या विठ्ठल कारखान्याप्रमाणे शेतकऱ्यांना भाव देऊ ज्यावेळी आपल्या प्रास्ताविकातून राजेंद्र बारकुंड यांनी आदिनाथ कारखाना आमदार संजय मामा शिंदे व आमदार बबनदादा शिंदे यांनी लक्ष घालून सुरू करावा आम्ही सभासद त्यांच्या ताब्यात कारखाना द्यायला तयार आहोत असे वक्तव्य केली होती यावर आमदार बबनदादा शिंदेंनी हे भाष्य केलेया कार्यक्रमात एका सभासदांनी आपले पुत्र विक्रम दादा शिंदे यांच्या कमलाई कारखान्याने मार्च अखेर गेलेल्या उसाचे अद्याप पहिले बिल दिले नाही त्याचे काय असा प्रश्न विचारल्यानंतर आमदार बबनदादा म्हणाले की शेतकऱ्यांना उसाचे पहिले बिल तात्काळ मिळले पाहिजे या मताचा मी आहे साखरेचे भाव वाढावेत व कारखान्याचा फायदा व्हावा या हेतूने विक्रम सिंह साखर विकत नाही त्यामुळे पेमेंट थकले आहे पण मी त्याला आता सांगितले आहे नफा नुकसानीचा विचार न करता तात्काळ साखर विकून शेतकऱ्यांचे उसाचे पैसे व तोडणी वाहतूकदारांचे कामगारांचे पैसे तात्काळ द्या असा सूचना विक्रम सिंह दिलेले आहेत पेमेंट उशिरा झाली ही चूक असून ही मला मान्य नाही असे मोठे मनाने आमदार बबनदादा शिंदे यांनी जाहीरपणे मान्य केलेयावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की राजेंद्र बारकुंड यांनी सहकार तत्वावर आदिनाथ चालवावा ही भूमिका मांडली यामुळे आता त्यांनी बारामती ॲग्रो व आमदार रोहित पवार चा चा नाद सोडला हे सिद्ध झाले आहे कोणीही कारखाना चालवावा पण कारखान्याच्या वजन काट्यावर जाण्यासाठी सभासदांना मोकळीक असावी ही भावना सभासदांची आहे असे मत महेश चिवटे यांनी मांडले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group