Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रमी 754 रक्तदात्यांचे रक्तदान…

 करमाळा प्रतिनिधी
करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या 31 जुलै रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त करमाळा माढा मतदारसंघांमध्ये दिनांक 26 जुलै ते 5 ऑगस्ट या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या शिबिरामध्ये 754 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे संपर्क कार्यालय करमाळा यांच्या वतीने देण्यात आली आहे.
आमदार संजयमामा शिंदे यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्याकडून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर, वृक्षारोपण, हिमोग्लोबिन तपासणी, वह्या व छत्री वाटप यासारखे अनेक समाजउपयोगी उपक्रम राबविलेले असून लवकरच करमाळा तालुक्यातील अंगणवाडी सेविका ,मदतनीस व आशा वर्कर यांचा सन्मान सोहळा (माहेर मेळावा ) आयोजित केला जाणार आहे.
रक्तदान हे जीवनदान आहे त्यामुळे या रक्तदानाचे महत्त्व ओळखून अनेक कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागासह शहरांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन केले त्यामध्ये 754 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची नोंद आहे .
कन्हेरगाव – 122,उपवटे – 72, कोर्टी 104, केतुर- 27, चिखलठाण – 37, करमाळा – 89, महेसगाव साखर कारखाना – 232 व भोसरे – 71 याप्रमाणे रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group