करमाळा

आज मुलांची कलाकृती पाहिली तर खऱ्या अर्थाने त्यांची कल्पकता मूर्ती मधून दिसून आली-गौसेवक डॉ.बापु तारसे

करमाळा प्रतिनिधी आज मुलांची कलाकृती पाहिली तर खऱ्या अर्थाने त्यांची कल्पकता मूर्ती मधून दिसून आली असे मत गोसेवक डॉ. बापू तारसे कुंभारगाव यांनी व्यक्त केलेते श्रमिक महिला मंडळ संचलित ज्ञानप्रबोधनी मतिमंद निवासी शाळा कोर्टी तालुका करमाळा जिल्हा सोलापूरयेथील इको फ्रेंडली श्री गणेशा या कार्यक्रमादरम्यान बोलत होते या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती ग्रामविकास संस्था पुणे, पृथ्वी सोशल फाउंडेशन करमाळा, राजनंदनी स्मृती फौंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.यावेळी कृष्णा बोराडे, शिवनाथ घोलप, नरेंद्रसिंह ठाकुर ,सुजित क्षिरसागर, मनोज बुऱ्हाडे, काका शिंदे, मफतराम चौधरी ,मुख्याध्यापक मोहन तळेकर, संस्था प्रमुख मोहित बागडे, रोहित बागडे आदी मान्यवर उपस्थित होते .पुढे ते म्हणाले की
आज या शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मुर्त्या पाहिल्या तर त्यांच्या मनाचे तरंग , त्यांची कल्पकता यामधून दिसून येते संस्थेमधील मुलांनी माती- शाडू माती यांच्यापासून पर्यावरण पूरक गणपती बनविले ही उल्लेखनीय बाब आहे.
कोणतेही प्रशिक्षण न देता सुबक सुंदर मुर्त्या पाहिल्या तर त्यांच्या मनातील अंतरंग यामध्ये दिसून येतात अशा पद्धतीने या मुलांना वेळोवेळी वाव दिल्यास नव नवीन निर्मिती जन्मास येणार आहे .
यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन महत्वाचे आहे या मुलांची कुशलता पाहिली तर मुलांकडून दिवाळीला ही पणत्या बनवल्या जातात आणि त्या मुंबई, पुणे ,बारामती, नगर अशा बाजारपेठा मध्ये जातात यावरून त्यांचे क्रयशक्ती दिसून येते संस्थेचा परिसर पाहिला तर खऱ्या अर्थाने मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संस्था पूर्ण निष्ठेने प्रयत्न करत आहे असे दिसून येते.यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, ड्रॉईंग वही, कलर, पेन देण्यात आले
यावेळी संस्थेचे स्वाती झाकणे, दिलीप माने, अनिकेत काळे, सुनील चौरे ,शैला शिंदे, बाबुराव शिंदे आदी जण उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!