करमाळा

मकाई कारखान्यासाठी सात अर्ज मंजुर उर्वरित अर्ज मंजुर होताच मकाईची निवडणुक लढवणार – प्रा.रामदास झोळ

करमाळा प्रतिनिधी श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमचे सात अर्ज मंजूर झाले असून उर्वरित अर्ज मंजूर होण्यासाठी आम्ही अपील केलेले आहे ते अर्ज मंजूर होतील याबाबत आम्हाला खात्री असून मकाईची निवडणूक आम्ही लढवणारच असे मत मकाई बचाव समितीचे प्रमुख प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले.दत्तकला शिक्षण संस्था स्वामी चिंचोली भिगवण येथे मकाई सहकारी साखर कारखाना बचाव समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. मकाई परिवर्तन पॅनलच्या नावाने ही निवडणुक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला शिंदे समर्थक आदिनाथ ची माजी अध्यक्ष वामनराव बदे मोहिते पाटील समर्थक’मकाई’ निवडणुकीच्यानिमीत्ताने आमदार संजयमामा शिंदे गटाचे समर्थक वामनराव बदे, मोहिते पाटील समर्थक आबासाहेब टापरे, स्वाभिमानीचे रविंद्र गोडगे, महेंद्र गोडसे, प्रा. लालासाहेब जगताप गफुर शेख आनंद झोळ  राजेंद्र भोसले  उपस्थित होते.
यावेळी मकाईच्या निवडणुकीत अपात्र ठरल्यानंतर अपिल दाखल केलेले विशाल शिंदे, प्रविण बाबर, वाळुंजकर आदी उमेदवार उपस्थित होते.
यावेळी स्नेहभोजन झाल्यानंतर राजकीय रणणितीबाबत चर्चा करण्यात आली. पात्र झालेल्या जागांवर आम्ही निवडणुक लढणार असून अपिलात न्याय मिळेल असा विश्वास प्रा. झोळ यांनी व्यक्त केला आहे. सविताराजे राजेभोसले व आम्ही सर्व एकत्रित या निवडणुकीत सामोर जात असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत त्यांच्यांशी चर्चा करून निर्णय घैऊन पुढील दिशा ठरवणार आहे .अपात्र अर्जाबाबत न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचे सांगितले. यावेळी अर्ज दाखल केलेले उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी विचारविनिमय पुढील रणनीती ही ठरवण्यात आली आहे होणाऱ्या सुनावणी बाबतही यावेळी चर्चा करण्यात आली त्यावरून पुढील रणनीती आखली. पोथरे, भिलारवाडी, वांगी, वरकटणे, राजुरी, वाशिंबे, उमरड, गोयेगाव, सोगाव, जातेगाव, हिंगणी येथील कार्यकर्ते उपस्थित होते

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group