करमाळा

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची अध्ययन यात्रेसाठी निवड

करमाळा प्रतिनिधी 
करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील हिंदी विभागातील बी.ए. तृतीय वर्षात अध्ययन करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांची छत्तीसगड येथे होणाऱ्या अहिंदी भाषिक विद्यार्थी अध्ययन यात्रेसाठी निवड झाली आहे. ही अध्ययन यात्रा दि. २२ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये श्री कृष्णा शेलार, श्री सलमान शेख, श्री योगेश हांडे, श्री चैतन्य भोगे व श्री सुधीर काळे यांचा समावेश आहे. या अध्ययन यात्रेचा संपूर्ण खर्च मानव संसाधन मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय हिंदी निदेशालय, नवी दिल्ली (भारत सरकार) यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.
महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्रमुख व उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हिंदी विषयाच्या विद्यार्थ्यांना अशा शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये हिंदी विषयाबद्दल अधिक रुची व आत्मविश्वास निर्माण होत असून त्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळत आहे.
या यशाबद्दल निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव मा. विलासराव घुमरे, अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, प्रभारी उपप्राचार्य प्रा. ए. पी. माने, प्रा. खरटमल तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले असून अध्ययन यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!