Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

वरकुटे येथील शहिद जवान नवनात गात स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर गजेंद्र पोळ काजल जाधव क्षितीज ग्रुप मानकरी

करमाळा प्रतिनिधी वरकुटे येथील शहिद जवान
नवनात गात स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यानुसार सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीगत पुरस्कार शेटफळ येथील सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र पोळ यांना तर सांघिक पुरस्कार ग्रुप करमाळा यांना देण्यात आले आहे.
मरणोत्तर शौर्य पुरस्कार शहिद जवान भारत कोंडिबा कांबळे, शैक्षणिक पुरस्कार खातगाव येथील जि.प.प्राथमिक शाळा तर क्रिडा क्षेत्रातील पुरस्कार कुस्तीपटू कु. काजल जाधव यांना जाहीर झाला आहे. यावेळी प्रथमच राज्यसेवा परीक्षा अंतर्गत यशस्वी झालेले रत्नदीप जगदाळे, निलेश भोसले, रोहिदास शिंदे, अक्षय शिंदे, डॉ. प्रा. अश्विनी भोसले, अनिल माने यांचे सन्मान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम २ मार्च ला `वारी सकाळी अकरा वाजता होणार आहे. यावेळी ळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार शिल्पा ठोकडे या उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ. बाबुराव हिरडे हे आहेत.
यावेळी प्रमुख उपस्थिती गणेश करे-पाटील, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी मनोज राऊत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आण्णासाहेब कांबळे, सैनिक संघटनेचे अध्यक्ष आक्रुड शिंदे, पिंपरी-चिंचवड वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, संजय निराधार योजनेचे अध्यक्ष विलास राऊत तसेच देविदास ताकमोगे सर, नानासाहेब नीळ, सोमनाथ देवकते, उद्योजक सुरज मालू, मुकूंद भोसले, गोकुळ मुके, अशोक पोकळे, साहेब जावळे हे उपस्थित राहणार आहेत. सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबीर होणार असून दहा ते अकरा यावेळेत ह.भ.प.गहिणीनाथ महाराज खेडकर किर्तन होणार आहे. यावेळी जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित रहावे; असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group