लोकशाही टिकवण्यासाठी समाज उभारणीसाठी विकासासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची–आमदार संजयमामा शिंदे
करमाळा प्रतिनिधी लोकशाही टिकवण्यासाठी समाज उभारणीसाठी विकासासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असून स्वातंत्र्य मिळण्यापासून सामाजिक न्याय मिळवुन देण्यासाठी समाजाबरोबर लोकप्रतिनिधींना आरसा दाखवण्यासाठी समाज कल्याणासाठी पत्रकारांनी कार्यात रहावे असे मत करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी व्यक्त केले. पत्रकार दिनानिमित्त करमाळ्यात विठ्ठल निवास येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. डॉ. बाबूराव हिरडे हे होते. मंचावर ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, अशोक नरसाळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ऍड. राहुल सावंत, राष्ट्रवादीचे अभिषेक आव्हाड व सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल अशपाक जमादार उपस्थित होते. याप्रसंगी आण्णा काळे, विशाल घोलप , अशोक मुरूमकर यांनी मनोगत व्यक्त केले . यावेळी पुढे बोलताना संजयमामा शिंदे म्हणाले की स्वांतत्रपूर्वीपासून पत्रकारिता खडतरमार्गाची राहिली आहे स्वातंत्र्य लढयामध्ये ही पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. शासनात काम करताना समाजाचे प्रतिबिंब पत्रकाराच्या लेखणीच्या माध्यमातून उठत असल्याने काम करण्यास लोकप्रतिनिधींना महत्त्वाची मदत होत असल्यामुळे लोकप्रतिनिधी प्रशासन समाज यांच्यामध्ये दुवा साधणारा पत्रकार मोलाचा घटक आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिम्मित करमाळा तालुका पत्रकार बांधवाचा पेन डायरी गुलाब पुष्प देऊन आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी जेष्ठ पत्रकार बाबुराव हिरडे यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हणाले की लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे सरकारी ध्येय धोरणे समाजविकासाच्या अनुषंगाने असावी ही माहिती पोहोचण्याची काम पत्रकारच तळागाळापर्यंत पोहोचतो मानवी जीवनात बदल घडवणारा पत्रकार आहे पत्रकारिता माणसाच्या जीवनाशी निगडित असणाऱ्या व्यवसायास असून सध्याच्या परिस्थितीमध्ये जर कोणी परिवर्तन घडवून आणला असेल तो तो पत्रकार असल्याची त्यांनी सांगितले समाज प्रशासन लोकप्रतिनिधी यांना विकासाची दिशा देणारा पत्रकार असून पत्रकारांनी विकासाची भूमिका लक्षात घेऊन लेखणी चालवावी असे आवाहश त्यांनी केले.या कार्यक्रमाची प्रास्ताविक सूत्रसंचालन आमदार संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आभार डॉक्टर विकास वीर यांनी केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
तुषार शिंदे, सुरज ढेरे,मानसिंग खंडागळे आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास पत्रकार आशपाक सय्यद दिनेश मडके, शंभूराजे फरतडे, जयंत दळवी, किशोर शिंदे,विशाल घोलप, धनंजय मोरे, सुनील भोसले, सिद्धार्थ वाघमारे, अलीम शेख, नाना पठाडे, दस्तगीर मुजावर, प्रविण अवचर ,नागेश चेंडगे, अंगद भांडवलकर, धर्मराज दळवी, सचिन जेव्हरी, जयंत कोष्टी, संजय मस्कर, विशाल परदेशी आदी उपस्थित होते.
