करमाळ्यात म.न.से कडुन 7 ॲागस्ट रोजी वीज बिल होळी आदोंलन

करमाळा प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्रात महावितरन कंपनी कडून वाढीव वीज बिलाची आकारणी केली जात आहे गेल्या चार महिने पासून लाॅकडाऊन असल्यामुळे अनेक नागरिकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे आणि त्यातच महावितरन कंपनी कडून वाढीव वीज बिलाची आकारणी केली जात आहे या वाढीव वीज बिलामुळे वीज ग्राहकांना त्रस्त झाले आहेत त्या मुळे येत्या सात ऑगस्ट रोजी महावितरन कंपनी एम.एस.ई.बी.समोर विज बील होळी आदोंलन करण्यात येणार असल्याची माहिती म.न.से. चे शहर प्रमुख नानासाहेब मोरे यांनी केली आहे
यावेळी वेळी महावितरन कंपनी ला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रात वीज ग्राहकांना वाढीव बिलाच्या मुद्दयावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे त्याच धर्तीवर करमाळा शहर म.न.से च्या वतीने विज बील होळी आदोंलन होणार असून करमाळा शहर व तालुक्यातील वीज ग्राहकांनी आप आपल्या दुकाना समोर मोकळया जागेत वाढीव वीज बिलाची होळी करून आपला निषेध नोंदवावा व या वीज बील होळी चे व्हिडिओ फोटो काढून राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे तसेच ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत यांना पाठवावा तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुकारलेल्या जन आदोंलनात सहभागी व्हावे. असे आवाहन सोलापुर जिल्हाध्यक्ष सतीश फंड जिल्हाउपाध्यक्ष राजेंद्र मोरे आनंद मोरे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे विजय रोकडे यांनी केले आहे.
