हाॅटेल ताजमहालचे मालक कासीम सय्यद यांचे दुखःद निधन.
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील हाॅटेल ताजमहाल चे मालक, कासीम (इन्रुस) अब्दुल सय्यद यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 69 व्या वर्षी दुखःद निधन झाले.
कासीम सय्यद यांना यासीन, इन्रुस या टोपन नावाने ते सर्वत्र परिचित होते. ते करमाळा शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक कुंभार समाजाची सवारीचे मानकरी होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुंभारवाडा, मोहल्ला, एसटी स्टँड परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव आनंदबाग दफनभूमीत दफन करण्यात आले. त्यांचे पश्चात तीन भाऊ, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

