Sunday, January 12, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

आमदार आपल्या दारी शासकीय योजना पोहचतील घरोघरी..!” कंदर येथे 11 एप्रिल रोजी संपन्न होणार

 

करमाळा प्रतिनिधी
विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम करमाळा विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येत आहे.यामध्ये नागरिकांना नवीन रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना आणि नवीन मतदार नोंदणी, उज्वला गॅस योजना, एस.टी. बस पास, मोतीबिंदू तपासणी व उपचार, आधार कार्ड नोंदणी, ई श्रम नोंदणी, दिव्यांग नोंदणी, असंघटित कामगारांची नोंदणी अशा विविध शासकीय योजनांच्या पात्रतेचे निकष सांगण्यात येतील. तसेच पात्र गरजु नागरिकांचे अर्ज कार्यक्रम स्थळी स्वीकारण्यात येवून त्यांची विविध योजनांसाठी निकषाप्रमाणे निवड करण्यात येईल.तरी नागरिकांना विनंती करण्यात येते की, सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व कागदपत्रे घेऊन शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहावे.

दिनांक – 11/04/ 2022.
वार – सोमवार.
ठिकाण – साईकृपा मंगल कार्यालय, कंदर.
सहभागी गावे – कंदर ,कविटगाव, बिटरगाव, सांगवी, सातवली, केम, वडशिवणे, मलवडी.
आपले विनीत –
आ. संजयमामा विठ्ठलराव शिंदे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group