सुरतालचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांचा पुरस्कार मानपत्र देऊन गोवाहटी येथे सन्मान
करमाळा प्रतिनिधी गोवाहटी येथील संगम महोत्सवात श्री प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.दिनांक १एप्रिल ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीमध्ये गुवाहाटी (आसाम) येथे आंतरराष्ट्रीय संगम महोत्सव तसेच गायन, वादन, नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये करमाळा येथील सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री बाळासाहेब नरारे यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्ल संस्थापक होलीराम बोराह , श्रीमती मोन बोराह , अध्यक्ष श्री गिताल मेहदी, श्री सनातन बापजी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार गुरू सेनियार मुक्तीयार बोरबायन यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जातो. या महोत्सवांमध्ये सुरताल संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ही महत्त्वपूर्ण सहभाग होता. अनेक विद्यार्थ्यांनी प्रथम पारितोषक मिळविले आहे. यावेळी नगरसेविका स्वाती फंड, रवींद्र विद्वत, डॉक्टर विजयकुमार जाधव, औदुंबर माकुडे, किशोरकुमार नरारे, संजय कांबळे इत्यादी पालक वर्ग उपस्थित होते.
