करमाळा

करमाळा नगरपालिकेच्या दहिगाव पंपीग स्टेशन येथील लोडशेडिंग बंद करण्याची नगरसेवक संजय सावंत यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी : करमाळा नगरपालिकेच्या दहिगाव येथील पंपीग स्टेशन येथील लोडशेडिंग त्वरित  बंद करण्यात यावे अशी मागणी करमाळा नगरपालिकेचे नगरसेवक संजय सावंत यांनी आज जेऊर येथे  महावितरण विद्युत  कंपनी चे उपकार्यकारी अभियंता यांचेकडे निवेदनाद्वारे  केली आहे .
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महावितरण कंपनी ने दहिगाव येथील पंपीग स्टेशन चे चार तास लोडशेडिंग केल्या मुळे आवश्यकतेनुसार  करमाळा नगरपालिका पाण्याची टाकी वर पाणी  पंपीग होत नाही त्या मुळे शहरास पाणी टंचाई जाणवत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होतो त्यामुळे दहिगाव येथील पंपीग स्टेशन येथील लोडशेडिंग बंद करावे अशी मागणी श्री.सावंत यांनी केली आहे. सदर निवेदनावऱ फारूक जमादार, दिपक सुपेकर, हाजी फारूक बेग, पांडुरंग सावंत, गणेश रंधवे आदी जणांच्या सहया आहेत.
error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group