लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या युवराज जगताप यांची मागणी

करमाळा प्रतिनिधी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्षाची सांगता दिनांक ०१ ऑगस्ट २०२० रोजी होत आहे . साहित्य आणि समाजकारणात साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांचे विशेष योगदान आहे.मागास मातंग समाजातून पुढे आलेल्या अण्णाभाऊनी वंचित समाजाच्या व्यथा , वेदना आपले साहित्य व शाहिरी कृतीतून अतिशय परीणामकार रित्या मांडल्या अशा या थोर समाज सुधारकास भारतरत्न पुरस्कार मिळाल्यास त्यांच्या कार्याला साजेल असे कार्य घडणार आहे . मातंग समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळणेबाबत योग्य तो निर्णय व्हावा अशी मागणी करमाळा मातंग समाजाचे युवा नेतृत्व युवराज भाऊ जगताप यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांना इमेल व्द्रारे मागणी केली आहे.
