जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांची करमाळा कोव्हीड सेंटरला भेट.

करमाळा प्रतिनिधी. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. अनिरुद्ध कांबळे यांनी. 24 जुलै रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथील करमाळा कोव्हीड सेंटरला भेट दिली. यावेळी गेल्या काही दिवसात पाॅझिटीव्ह आलेल्या रुग्णांशी संवाद साधुन त्यांना जाणवणारी लक्षणे , त्यांच्या अडचणी,सोयी,सुविधा यांविषयी माहिती घेतली,कोव्हीड सेंटरमधील स्वच्छते संबधी प्रशासनाला सुचना केल्या आहेत. सध्या कोव्हीड सेंटरमधील सर्व रुग्ण non symptomatic असुन,प्रशासन रुग्णांची घेत असलेल्या काळजीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी तहसीलदार समीर माने,पं.स.सभापती गहिनीनाथ ननवरे, गटविकास अधिकारी खरात साहेब,करमाळा तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. घोगरे,युवक नेते अजितदादा तळेकर,ज्ञानेश पवार उपस्थित होते.
