नागराज मित्र मंडळाच्यावतीने नागपंचमी उत्सव साध्या पध्दतीने साजरा

करमाळा प्रतिनिधी नागराज मित्र मंडळ नागराज चौक सुतारगल्ली करमाळा यांच्यावतीने दरवर्षी सालाबादप्रमाणे नागपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून करमाळा शहर व परिसरातील भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात. दर्शनाला येणाऱ्या भाविकांना दरवर्षी महाप्रसादाचे वाटप करण्यात येत असून यंदाच्या वर्षी मात्र प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार हा नागपंचमीचा मोठा उत्सव रद्द करण्यात आला आहे. या वर्षी मात्र नागपंचमी उत्सवाची पंरपरा खंडीत होऊ नये म्हणून नागपंचमीचा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनचे पालन करुन भावीकांची गर्दी न करता साध्या पद्धतीने नागराज देवतेच्या प्रतिमेचे पूजन करून अभिषेक करून साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे.
