मा.पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेचा छोटे व्यावसायिकांनी लाभ घ्यावा-जगदिश आगरवाल

करमाळा प्रतिनिधी नरेंद्रसिंह ठाकुर. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे अनेक लहान मोठे व्यावसायिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असून याकरीता मा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीची घोषणा केली आहे या योजनेचा जास्तीत जास्त छोटे व्यावसायिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रकारचे
लहान दुकानदार, भाजीपाला व फळं विक्रते, फेरीवाले, चहा टपरी, वडापाव,खाद्यपदार्थ विक्रेते, चप्पल कारागिर,केशकर्तनालय, लॉड्रि दुकानदार,
तसेच इतर दुकानदारांना खेळते भांडवल म्हणुन
रु 10,000/- राष्ट्रीयकृत बँकेच्या मार्फत 1 वर्षे परतफेडीच्या अटीवर उपलब्ध करून देण्यासाठी आत्मनिर्भर निधी देण्यात येत आहे. तरी या योजनेचा जास्तीत जास्त दुकानदारांनी लाभ घ्यावा या योजनेच्या अधिक माहितीसाठी आमच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांनी केले आहे.
यावेळी सिनेट सदस्य दिपक चव्हाण, अमरजीत साळुंके, नरेंद्रसिंह ठाकूर उपस्थित होते.
