करमाळा

आम आदमी पार्टी सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी करमाळ्याचे अमोल जाधव यांची निवड

करमाळा प्रतिनिधी आम आदमी पार्टी सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी करमाळा येथील अमोल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर निवड महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी गोपाल इटालिया, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील व सोलापूर जिल्हा अध्यक्ष महादेव पाटील यांनी संघटनात्मक निवड पत्र देऊन केली आहे.निवडीनंतर जाधव म्हणाले प्रत्येक तालुक्यातील, गावातील तसेच शहरातील नागरिकांना आम आदमी पार्टीचे लक्ष व धोरणे समजावून आम आदमी पार्टीचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम तन मन धनाने करणार असल्याचे सांगितले.निवडीनंतर आम आदमी पार्टीचे जिल्हा व राज्याचे आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे जाधव यांना शुभेच्छा दिल्या तसेच सोशल मीडिया द्वारे शुभेच्छा देण्यात आल्या जाधव यांच्या निवडीचे स्वागत करमाळा तालुक्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group