भारतीय ध्वजाचा जाणीवपूर्वक अवमान करण्याच्या उद्देशाने कृत्य केले याची सखोल चौकशी करून आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई करावी-यशपाल कांबळे
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) युवक आघाडी जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले राष्ट्रध्वजामधील तीनही रंग समान असले पाहिजेत ते नाहीत व अशोक चक्र मध्यभागी असणे गरजेचे आहे असे नियमावली सांगते असे असताना देखील चीन या राष्ट्राने भारतीय ध्वजाचा जाणीवपूर्वक अवमान करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले आहे याची सखोल चौकशी करून आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई करावी अन्यथा भारत देशासाठी आंदोलन जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे*
निवेदनात म्हटले आहे की येत्या 15 ऑगस्ट 2022 ला देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहे आपण सर्व भारतीय हा दिवस आजदी का अमृत महोत्सव म्हणून साजरा आहोत याचे संपूर्ण भारतातून स्वागत होत आहे
असे असताना मागील काही दिवसांमध्ये देशाचे प्रधानमंत्री यांनी चीन हा दुश्मन देश असल्याने चीन मधून येणाऱ्या सर्व वस्तू तथा सर्व ॲप यांच्यावर निर्बंध लागु केले होते
असे असताना देखील हर घर तिरंगा अभियानासाठी लागणारे सर्व झेंड्याचे टेंडर चीन या देशाच्या एका कंपनीला देण्यात आले तेथून आलेले सर्व झेंडे आपल्या राष्ट्रध्वजाच्या कोणत्याही नियमावलीत बसत नाहीत यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी भारतीय राष्ट्रध्वज समिती गठीत करण्यात आली होती या समितीने भारताचा राष्ट्रीय ध्वज ज्याला सामान्यतः आपण तिरंगा म्हणतो हा भगवा पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगाच्या क्षैतिज आयताकृती ध्वज आहे तसेच निळ्या रंगाचे अशोक चक्र हे मध्यभागी आहे दिनांक 22 जुलै १९४७ रोजी झालेल्या संविधान सभेच्या बैठकीत तो सध्याच्या स्वरूपात स्वीकारण्यात आला आणि तो 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचा अधिकृत ध्वज बनला समितीने त्यावेळी राष्ट्रध्वजाची नियमावली तयार केली होती यामध्ये तिन्ही रंग समान आकाराचे असतील व अशोक चक्र हे मध्यभागी असेल असे असताना राष्ट्रध्वजाचे टेंडर चीनच्या कंपनीला देण्यात आले चीन हा देश भारताचा दुश्मन देश आहे चीनने भारतीय राष्ट्रध्वजाचा आव्हान करण्याच्या उद्देशाने तिन्ही रंग समान छापले नाही तसेच अशोक चक्र मध्यभागी नाहीचीनने भारतीय राष्ट्रध्वजाचा आव्हान करण्याच्या उद्देशाने तिन्ही रंग समान छापले नाही तसेच अशोक चक्र मध्ये बागे नाही हवामान आम्ही भारतीय म्हणून कधी खपवून घेणार नाही.यासंदर्भात सर्व बाजूने व आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी करून आपण आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी योग्य ते पावले उचलावे व तात्काळ कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन करमाळा तहसीलदार यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाआठवले युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांनी दिले यावेळी उपस्थित प्रसेनजीत कांबळे मातंग आघाडीचे शरद पवार बापू वाघमारे रंजीत कांबळे करण रोहन ताया वाघमोडे रोहन भोसले गणेश कांबळे आदित्य घोडके बुद्धभूषण घोडके अनिकेत कांबळे विजय कांबळे हर्षवर्धन आहेर हर्षद कांबळे प्रबुद्ध लांडगे यश निकाळजे धनराज चौधरी अजय घोडके विशाल कांबळे आयुष साळवे अमोल खराडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
