करमाळा शिवसेना शहरप्रमुखपदी प्रविण कटारिया यांची निवड
करमाळा प्रतिनिधी जय महाराष्ट्र मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रविण कटारिया यांची करमाळा शहरप्रमुख म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी पत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.
याबाबतचे वृत्त शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या सामना मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहे. करमाळा शहर प्रमुख पदाची जागा गेल्या अडीच वर्षापासून रिक्त होती. या पदासाठी अनेकजणांची रस्सीखेच चालू होती. यामध्ये कटारिया यांनी बाजी मारली आहे. प्रवीण कटारिया यांनी शहरप्रमुख पदावर अनेक वर्षे काम केले आहे. त्यांच्या कामाचा अनुभव पाहता शिवसेना पक्षाचे निष्ठेने काम केल्यामुळे पक्षाने त्यांचेवर पुन्हा एकदा शहरप्रमुख पदाची जबाबदारी टाकली आहे. त्यानूसार करमाळा शहर प्रमुख म्हणून प्रविण कटारिया यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत शिवसैनिकांनी केले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी टाकलेली शहरप्रमुख पदाची जबाबदारी उत्तमरितीने पार पाडून शहरात वॉर्डनिहाय शिवसेनेच्या शाखा काढण्याचे नियोजन करून घर तेथे शिवसेना हे अभियानही राबविले जाईल. शहरात शिवसेनेचा मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. शहरात संवाद मेळावा आयोजित करून नागरीकांच्या समस्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शिवसेने मार्फत आंदोलन करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.…प्रविण कटारिया शहरप्रमुख शिवसेना
