दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली विचारविनिमय बैठक जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणनीती ठरणार 12 जानेवारीला नागरी सत्कार
करमाळा प्रतिनिधी
सोमवार, दि. १२ जानेवारी रोजी दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणनीती ठरविण्यात येणार आहे. बैठकीस भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बागल परिवाराचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.
दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याबाबत चर्चा सुरू असून, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या विषयावर बैठकीत चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे
भाजपा युवा नेते दिग्विजय बागल यांचा याच दिवशी वाढदिवस असून, त्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


