करमाळा

ज्येष्ठ पत्रकार नरसिंह चिवटे यांचा पुण्यात रविवारी सत्कार

करमाळा प्रतिनिधी
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा पत्रकार नरसिंह मनोहर चिवटे यांचा सत्कार सोहळा रविवार (ता. 11) रोजी सकाळी 11 वाजता पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे.
या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा आदर्श पालकत्व या योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास पद्मश्री गिरीश प्रभुणे उपस्थित राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मेधा कुलकर्णी, राजमाता जिजाऊ यांच्या वंशातील रणजितसिंह जाधव तसेच सह्याद्री कन्या डॉ. शीतल मालुसरे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन शहाजी आदर्श पालक पुरस्कार पत्रकार नरसिंह चिवटे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यास पुणे व परिसरात वास्तव्यास असलेल्या करमाळा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पत्रकार संघाचे सचिव कबीर यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!