राजस्थान सुराणा येथील आरोपी शिक्षक छेल सिंग याला फाशीची शिक्षा द्या :- यशपाल कांबळे
करमाळा प्रतिनिधी सुराणा येथील असलेले सरस्वती विद्यालयामध्ये इयत्ता तिसरी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी इंद्रकुमार मेघवाल यांनी पिण्याच्या पाण्याच्या माठाला हात का लावला म्हणून आरोपी शिक्षक छेल सिंह याने जातीय आकासापोटी बेदम मारहाण केली यामध्ये विद्यार्थ्यांचा अहमदाबाद येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे यामध्ये प्रकरण मिटविण्यासाठी छेल सिंह याने दीड लाख देतो असे म्हटले आहे अशा या शिक्षकास कठोरात कठोर शिक्षक द्यावी करमाळा तहसीलदार यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी(आठवले) जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये म्हटले आहे की येत्या दर दिवसाला दलितांवरील अन्याय अत्याचारात वाढ होत चाललेले आहे यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत व अनुसूचित जाती जमाती (ॲट्रॉसिटी ॲक्ट) कायदा अधिककात अधिक मजबूत व भक्कम आणि कडक करण्यात यावा या सर्व प्रकरणाचा आढावा घेत प्रशासनाने जातीय कारणावरून इंद्रकुमार मेघवाल याची हत्या केल्या कारणाने आरोपी शिक्षक छेलसिंह याला तात्काळ फाशीची शिक्षा द्या अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यशपाल कांबळे यांनी दिला यावेळी रणजीत कांबळे. सुरज पवार. संदीप कांबळे. राज कांबळे. आकाश कांबळे. उदय कांबळे. आदित्य घोडके. आदेश घोडके . समाधान शिंदे. गणेश कांबळे. विशाल कांबळे. धनराज चौधरी. ओम कांबळे. अनिकेत साळवे. यश निकाळजे आदी जण उपस्थित होते.
