करमाळा

स्वराज्याची जननी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केल्यास स्रियांवरती अत्याचार होणार नाही -यशवंतभाऊ गायकवाड

सावडी प्रतिनिधी
सावडी ता.करमाळा येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती ,छत्रपती शाहू महाराज युवक प्रतिष्ठान व बचत गटाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थीनींच्या हास्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीमांना पुष्प अर्पण करून व दिप ज्वलन करून साजरी करण्यात आली
त्याप्रसंगी बोलताना छत्रपती शाहू महाराज युवक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आ कामगार आघाडीचे पच्छिम महाराष्ट्राचे नेते मा.यशवंतभाऊ गायकवाड म्हणाले राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे कार्य सर्वांना प्रेरनादायी आहे.त्यांचा जन्म सिंदखेडराजाचे शुर व स्वतंत्रबाण्याचे सरदार लखुजीराजे जाधव व म्हाळसाईच्या पोटी 12 जानेवारी 1598 रोजी झाला, चार मुलाच्या नंतर मुलगी जन्माला आली म्हणून लखुजीराज्यांनी सगळीकडे दिप उजळू व साखर वाटून ,स्री जन्माचे स्वागत केल्याचे दिसून येते.अशा या सर्वगुन संपन्न अशा जिजाऊंचा विवाह शहाजीराजें बरोबर झाला.व पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना शस्त्र व शास्त्रामध्ये पारंगत करुन जुलमी अन्याय अत्याचाराचा बीमोड करण्यासाठी स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरीत करून स्वराज्याची स्थापना केली.आज स्त्रियांनी चुल व मुलांमधी गुरफटून न राहता जिजाऊ माँसाहेबांचे विचार अंगीकारने गरजेचे आहे,व जिजाऊ माँसाहेबांचे विचार व शिव तंत्र डोक्यात घेऊन वाट चाल केल्यास,स्रियांवरती कदापी अन्याय होणार नाही असे प्रतिपादन केले.त्यावेळी ग्रामसंघाच्या अध्यक्षा व पत्रकार प्रमिला जाधव अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या.तर कार्य क्रमाचे सुत्रसंचलन रेखा शेलार यांनी केले त्यावेळी सौ.गिता गायकवाड,सौ.वैजंताबाई गायकवाड,सौ.अंजना शेलार,सौ.मिराबाई शेलार,सौ.दिव्या गायकवाड,दादा शेलार, गणेश शेलार,ज्ञानेश्वर गायकवाड, महादेव शेलार, शंकर गायकवाड,व बहुसंख्येने शालेय विद्यार्थीनीं उपस्थित होत्या.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group