मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त पोथरे येथे ऊसतोड कामगारांना शांतिलाल झिंजाडे यांच्याकडुन ब्लॅकेंट वाटप
करमाळा प्रतिनिधी बागल गटाचे युवानेते मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त पोथरे येथे ऊसतोड कामगारांना शांतीलाल सुभेदार झिंजाडे यांच्यावतीने थंडीपासून सुरक्षा होण्यासाठी रघ (ब्लॅंकेट) चे वाटप करण्यात आले. यावेळी शिवरत्न मित्रमंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र झिंजाडे, ज्येष्ठ नेते किसन झिंजाडे, चंद्रकांत झिंजाडे, आबा ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष ठोंबरे, राहुल खराडे, राजेंद्र हिरडे आदी उपस्थित होते. यावेळी झिंजाडे म्हणाले की, श्री बागल यांच्या वाढदिवसानिमित्त हार तुरे यावर खर्च करण्यापेक्षा गरजूंना मदतीचा हात घेऊन गटाचे नेते दिग्विजय बागल यांचा वाढदिवस साजरा करण्याचा आपला मानस होता. सध्या थंडीचे दिवस असल्याने ऊसतोड कामगारांना पहाटेच ऊस तोडण्यासाठी जावे लागते. त्यांना उबदार कपड्याची आवश्यकता होती ही बाब लक्षात घेऊन आपण हा उपक्रम राबवला आहे. यावेळी. यावेळी आबासाहेब झिंजाडे, कैलास खराडे, तात्या शिंदे, संदीप चव्हाण, सुधीर झिंजाडे, किरण बदे, विनोद तारकर, कृष्णा सोनवणे, संजय सोनवणे, संदीप सोनवणे, आनंदा पवार, दिलीप पवार आदी उपस्थित होते.
