एसटी बस न थांबल्याने विद्यार्थ्याची मोठी गैरसोय झाली असुन ताबडतोब याची दखल घेऊन एस टी थांबा द्यावा युवा नेते अमोल झाकणे यांची मागणी
करमाळा प्रतिनिधी शाळेजवळ एसटी बस न थांबल्याने विद्यार्थ्याची मोठी गैरसोय झाली असुन ताबडतोब याची दखल घेऊन एस टी थांबा द्यावा अशी मागणी आगारप्रमुखाकडे कोर्टीचे युवा नेते अमोल झाकणे यांनी केली आहे. करमाळा तालुक्यातील कोर्टी,अंजनडोह मोरवड . रोशेवाडी,पिंपळवाडी, वीट, विहाळ या भागातील विद्यार्थी विद्यार्थिनी शालेय शिक्षण घेण्यासाठी करमाळा येथील गिरधरदास देवी विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येथे येत असून या विद्यालया जवळ एसटी बस न थांबल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली निर्माण झाली आहे या प्रकरणाची ताबडतोब दखल घेऊन करमाळा पुणे गाडी यापुढे वेळेत न थांबल्यास याची वरिष्ठाकडे तक्रार करून विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
