Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळा

शेलगावचे सुपूत्र शुभम भरत वीर यांचे C.A.✓ परीक्षेत यश

शेलगाव प्रतिनिधी
शेलगावचे सुपूत्र शुभम भरत वीर यांनी सीए परीक्षेत यश प्राप्त करून शेलगावचे नाव महाराष्ट्रासह संपूर्ण देशात रोशन केले आहे. हे यश त्यांनी वयाच्या 25 व्या वर्षी मिळवले आहे. बीकॉम नंतर सीए परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली होती. हे यश त्यांनी पहिल्याच प्रयत्नात प्राप्त केले आहे.सीए (चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षा ही संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांमधून घेतली जाते. या परीक्षेचा सरासरी निकाल 3 ते 4 टक्के इतका असतो. शुभम यांनी अथक परिश्रम व मेहनत घेऊन हे यश प्राप्त केले आहे. यापूर्वी शेलगावमध्ये कोणीही सीए परीक्षेत उत्तीर्ण झाले नव्हते. सीए परीक्षेत उत्तीर्ण होणारा शुभम हा शेलगावमधील पहिलाच व एकमेव विद्यार्थी आहे.
त्याच्या या यशात वडील भरत एकनाथ वीर (निवृत्त सेल टॅक्स अधिकारी) व आई लताताई चुलते नागनाथ वीर, चांगदेव वीर, आजी शांताबाई वीर यांचा मोलाचा वाटा आहे. सीए परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी त्याला शिक्षक वृंद व वडील भरत वीर यांनी मौलिक असे मार्गदर्शन केले. त्यांनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल शेलगावचे सरपंच प्रा.अशोक काटुळे सर , सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्याकडून कौतुक केले जात आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group