करमाळा

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण आवाज उठवला त्याचा राग मनात धरून माझ्यावर हल्ला-महेश चिवटे शिवसेना जिल्हा प्रमुख

करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण आवाज उठवला त्याचा राग मनात धरून आपल्यावर जवळच्या लोकांमार्फत हल्ला केला असल्याबाबतचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेना    उप तालुकाप्रमुख डॉक्टर गौतम रोडे , विधानसभा संघटक राहुल कानगुडे प्रशांत राजेभोसले, शहराध्यक्ष अंकुश जाधव उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना शेवटी चिवटे यांनी सांगितले की  मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा निष्ठावंत कार्यकर्ता असून सोलापूर जिल्हा प्रमुख म्हणून प्रामाणिकपणे काम करत आहे ‌ विधानसभेलाही मला विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा असतानाही आमचे लहान बंधू मंगेश चिवटे यांच्याशी चर्चा करून ही जागा महायुतीची असतानाही शिवसेनेला जागा सोडून दिग्विजय बागल शिवसेनेचे उमेदवारी दिली व त्यांचा प्रामाणिकपणे प्रचार केला . मी माझ्या उमेदवारीचा त्याग करून पक्ष आदेश शिरसावद म्हणून काम केले त्यामुळे आमच्या मनामध्ये कुठलेही प्रकारचे याबाबत वैमनस्य नसल्याचे सांगितले. केवळ आम्ही मकाई कारखान्याला आलेल्या पैशाच्या माध्यमातून शेतकरी कामगार हिताची भाषा केली तर यांना त्याचा राग आला त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यामार्फत आम्हाला भीती दाखवण्यासाठी हा भ्याड हल्ला केला आहे . माजी आमदार जयवंतराव जगताप यांना शिवसेनेत आल्यापासुन तीन वेळा आमची शाब्दिक चकमक झाली आहे.शिवसेनेत येणाऱ्या माणसांमुळे त्याचा परिणाम त्यांच्या कार्यपध्दतीवर झाला आहे. या गोष्टीचा आमच्यावर कुठलाही परिणाम होणार नसून जनता जनार्दन व समोर लवकरच सत्य येणार आहे माझा लांडगे कुटुंबातील कुणाशीही माझे भांडण नसून आर्थिक व्यवहार बाबत जे सांगितले आहे हे पूर्णतः चुकीचे आहे . उलट ‌ लांडगे कुटुंबातील त्यांच्या भावकीतील माणसाकडे 2013 पासून खताचे पैसे होते. याबाबत ते पैसे देण्याचा शब्द दिग्विजय बागल यांनी दिला होता त्याप्रमाणे त्यांनी कारखान्या मार्फत मला चेक द्वारे पैसे दिले होते. याचा अर्थार्थी माझ्यावर हल्ला करणाऱ्यांशी कुठलाही प्रकारचा संबंध नाही.बागल गटाच्या नेत्या सौ.रश्मी दिदी बागल यांनीही त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या माणसांना खरे बोलण्यामुळे सर्व लोकांना त्रास देण्याचे आतापर्यंत काम केले आहे. ते राजकारणातून तरी आज बाहेर असले तरी त्यांची खरी परिस्थिती आमच्याकडे सांगत आहे. मी पहिल्यापासून चळवळीत काम करणारा कार्यकर्ता असून कुणालाही भीत नाही कारण माझे काम प्रामाणिक असल्याने पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे. शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सर्व निवडणुका लढवणार असून जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!