Monday, April 21, 2025
Latest:
करमाळा

करमाळा येथील दिवाणी न्यायाधिश वरिष्ठस्तर कोर्टाला अंतिम मान्यता मिळाल्याची बातमी मिळताच करमाळा बार असोसिएशन तर्फे आनंदोत्सव

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर कोर्टाला अंतिम मान्यता मिळालेची बातमी मिळताच करमाळा बार असोसिएशन तर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आपले येथील पक्षकार आणि वकील मंडळींना करमाळा शहरापासुन बार्शीला वरिष्ठ कोर्टात जाण्यासाठी ६५ किमी अंतर पार करावे लागत होते. त्यातच करमाळा बार्शी रस्त्याची दयनीय आवस्था, गैरसाय यामुळे पक्षकार आणि येथील वकील मंडळींची गेली अनेक वर्षापासुन करमाळा येथे दिवाणी न्यायाधिश व. स्तर आणि अति. जिल्हा व सत्र न्यायाधिश बेंच करीता मागणी होती. याबाबत वकील संघाकडुन कायमच पाठपुरावा चालु होता. यासाठी आजपर्यंत वकील संघाचे निवड झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांचे सह सर्व वकील मंडळींनी शर्थीचे प्रयत्न केले. या मागणी करिता राजकीय पटावरील सर्वांनीच सहकार्य केले असुन, विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी याबाबतचा संपुर्ण पाठपुरावा करून हे काम शासनाकडुन करूनच घेतले. याकरीता आज करमाळा वकील संघाने जल्लोष करून, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार. संजयमामा शिंदे ,ॲड. सचिन देवकर, यांचेसह मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री , प्रमुख जिल्हा न्यायाधिश यांनी केलेल्या सहकार्या बद्दल आभार पर प्रस्ताव पारित केला व करमाळा न्यायालयातील बार असोसिएशन च्या कार्यालयात करमाळा येथील न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सौ. एखे मॅडम, सह दिवाणी न्यायाधीश शिवरात्री साहेब यांचे उपस्थितीत पेढे वाटुन आनंद साजरा केला आहे. लवकरच करमाळा येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय चालु होणार असुन यामुळे पक्षकार व वकील मंडळींना होणारा त्रासातुन सुटका होणार आहे. त्यामुळे आज वकीलसंघातील सर्व विधिज्ञांनी जल्लोष केला. याबाबतची माहीती वकील संघाचे अध्यक्ष ॲड विकास जरांडे, उपाध्यक्ष प्रमोद जाधव, सचिव. योगेश शिंपी, सहसचिव ॲड. विनोद चौधरी, खजिनदार ॲड. पी. के. पवार यांनी दिली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group