मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन शाखा करमाळा यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 260 रक्तदात्यांचे रक्तदान
करमाळा प्रतिनिधी मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात २६० जणांनी रक्तदान केले . या शिबीराचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले. या प्रसंगी संत निरंकारी मंडळाचे सोलापूर झोनचे ज्ञानप्रचारक चाँदभाई तांबोळी महाराज ,करमाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप ,मकाई साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार , जि.प सोलापूरचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड , पंचायत समिती शिक्षण विभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम प्रभावती जगताप , सरपंच रविंद्र वळेकर, पत्रकार – जयंत दळवी ,अंगद देवकते, बाळासाहेब भिसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्ञान प्रचारक चाँदभाई तांबोळी महाराज यांनी संत निरंकारी मंडळाच्या आध्यात्मिक व सामाजिक समाजोपयोगी मानवतावादी कार्याची माहिती दिली .
या शिबीरात रक्तसंकलनाचे काम बार्शी येथील श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी , सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल , श्रीम. गोपाबाई दमाणी ब्लड बँक यांनी उत्कृष्टपणे केले .
*अनेक मान्यवरांनी स्वतः रक्तदान करून संत निरंकारी मंडळाच्या मानवतावादी निष्काम कार्याचे कौतूक केले* . रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा सन्मान पुस्तक व रोप देवून करण्यात आला .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवादल अधिकारी रमेश वारे , भैरू वळेकर ,वैशाली सरडे , मुकुंद साळूंके , अंगद पडवळे, बप्पा धडस , एकनाथ निमगीरे, मोहन चोरमले ,मनधीर शिंदे ,सुनील भोगे तसेच सर्व महिला व पुरुष सेवादल यांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल शिंदे यांनी केले तर सर्व रक्तदात्यांचे मान्यवरांचे व रक्तपेढीच्या सर्व डॉक्टरांचे आभार करमाळा ब्रँच मुखी पोपट थोरात यांनी मानले .


