Monday, April 21, 2025
Latest:
Uncategorized

वनखाते नरभक्षक बिबट्याला कधी ठार मारणार का रक्षण करणार शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ आवताडे यांचा सवाल

करमाळा प्रतिनिधी

नरभक्षक बिबट्याने करमाळा तालुक्यात धुमाकूळ घातला असून गेल्या दहा दिवसांपासून वनखात्याला बिबट्याला जेरबंद ठार करण्यास यश आले नाही त्यामुळे आता सर्वसामान्य माणसाला बिबट्याला मारण्यास शासनाने परवानगी देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ आवताडे यांनी केली आहे. सध्या करमाळा शहर व तालुक्यात बिबट्याने मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली असुन आतापर्यंत करमाळा तालुक्यातील तीन निष्पाप व्यक्तींचे बळी घेतले असून नरभक्षक बिबट्याच्या आमच्या येथे दिसला तर कधी शेतामध्ये दिसला अशा विविध अफवा वाड्यावस्त्यावर होत असल्यामुळे नरभक्षक बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे बंद केली असून त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.वनखात्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला त्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता बिबटा जेरबंद होत नाही असे लक्षात आल्यावर बिबट्याला ठार मारण्यासाठी शार्पशुटरला बोलवण्यात आले व त्यांच्या सहाय्याने बिबट्याला ठार मारण्याची मोहीम राबविण्यात आली असून यामध्ये वनखात्याला अपयश आले असून बिबट्याला ठार मारण्यासाठी शार्पशुटर बोलवण्यात आले आहे की त्यांचे रक्षण करण्यासाठी असा सवाल शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ आवताडे यांनी केला असुन आता सर्वसामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे त्यामुळे वनखात्याने बिबट्याला ठार मारण्यासाठी सर्व सामान्य शेतकरी जनतेला परवानगी द्यावी व करमाळा तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ आवताडे यांनी केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group