करमाळा तालुक्याची कुलस्वामिनी श्री कमलाभवानीचे करमाळयाचे आमदार संजयमामा शिंदेनी घेतले दर्शन
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत आई कमलाभवानी मंदिरात करमाळा तालुक्याचे विकास प्रिय विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी श्री देवीचामाळ येथील कमला भवानी मंदिरात आई कमलाभवानीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला . श्री कमलाभवानी ट्रस्टच्या वतीने आमदार संजयमामा शिंदे यांचा सत्कार कमलाभवानीची प्रतिमा देऊन आला .यावेळी पत्रकार विवेक येवले श्री देवीचा माळ सरपंच महेश सोरटे उपसरपंच दिपक थोरबोले माजी सरपंच दादासाहेब पुजारी नारायण सोरटे देवळालीचे सरपंच आशिष आण्णा गायकवाड आदिनाथ सहकारीसाखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी बापू झोळ, लव्हे गावचे सरपंच विलास दादापाटील ,महाराष्ट्र केसरी चंद्रास बापू निमगिरे, माणिक दादा पाटील, श्री देवीचामाळ तंटामुक्ती अध्यक्ष सचिन चोरमुले, सदस्य अमोल चव्हाण, सचिन शिंदे ,संतोष पवार, ओंकार पुजारी, केतन जगताप, रत्नदीप पुजारी, संदीप पुजारी सर निंबाळकरसाहेब कमलाभवानी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी महादेव भोसले साहेब अशोक गाठे कमलाभवानी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
